शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
7
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
8
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
9
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
10
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
11
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
12
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
13
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
14
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
15
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
16
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
17
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
18
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
19
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
20
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर

दहावी, बारावीची परीक्षा जून किंवा त्यानंतरच घ्या!, ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 07:11 IST

exams : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले.

मुंबई : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्यावी, असे मत ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी मांडले.दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यात २,६०० हून अधिक शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले हाेते. सध्याच्या वाढत्या काेराेना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२.२ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी जूनमध्ये, तर ३३.१ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी जुलै महिन्यात परीक्षा घ्यावी, असे मत मांडले. एकूण ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी सध्या परीक्षा घेण्यास विराेध दर्शविला. २४.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेच त्याच नियोजनाप्रमाणे एप्रिल, मे महिन्यातच घ्याव्यात, असे मत मांडले. या सर्वेक्षणात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील, विशेषतः मुंबईतील सर्वाधिक शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला.यात राज्यातील ४५.५ टक्के शिक्षकांनी, तर ४०.७ टक्के विद्यार्थ्यांनी मते मांडली. सर्वेक्षणात पालकांचा सहभाग ११.७ टक्के हाेता, तर इतर व्यावसायिक आणि अन्य आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या का, या प्रश्नावर ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी त्या पुढे ढकलाव्या, अशी मागणी केली आहे. ३०.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलू नयेत, असे मत सर्वेक्षणात नोंदविले.याशिवाय दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान होईल का, या प्रश्नावर ३८.१ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी नुकसान होईल, असे मत मांडले. तर तब्बल ६१.९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे मत नोंदविले. एकंदर सार्वजनिक आरोग्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच परीक्षा व्हाव्यात, अशी भूमिका शिक्षक परिषदेकडे मांडण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मतांचा आदर करून निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस देणे, विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करणे आणि परीक्षा केंद्रांवर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करून आवश्यक ती सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध केल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने यापूर्वी शासनाकडे केली आहे. परंतु सध्याची वाढती कोविड रुग्णसंख्या पाहता विद्यार्थ्यांच्या आराेग्याच्या दृष्टीने तसेच कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच भूमिका आमची आहे.- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस