विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राच्या माध्यमातून अभ्यासक्रम

By Admin | Updated: June 27, 2016 02:23 IST2016-06-27T02:23:58+5:302016-06-27T02:23:58+5:30

ठाणे शहरामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Syllabus through Sub-Centers for Students | विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राच्या माध्यमातून अभ्यासक्रम

विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्राच्या माध्यमातून अभ्यासक्रम


ठाणे : ठाणे शहरामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ठाणे येथील मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातंर्गत बहि:शाल विभाग सुरू करण्याची मागणी महापौर संजय मोरे यांनी मंगळवारी केली.
बाळकूम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राची पाहणी महापौरांनी केली. यावेळी सभागृह नेत्या अ‍ॅड. अनिता गौरी, माजी सिनेट सदस्य महादेव जगताप उपस्थित होते. यावेळी या उपकेंद्राच्या केंद्रप्रमुख डॉ. प्रसाद कर्णिक, सहाय्यक कुलसचिव सुखदा धोत्रे व प्रा. गावित यांचेशी महापौरांनी चर्चा केली.
सध्या या ठिकाणी बीएमएस व एमबीए हे दोन अभ्यासक्र म सुरू असून याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये असे दोन अभ्यासक्र म सुरू करणारे ठाणे हे पहिले शहर आहे. याच धर्तीवर प्रवेशापासून वंचित असलेले दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी आयडॉल सेंटर सुरू करावे, ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड टूरिझम, वैद्यकीय अभ्यासक्र म तसेच गरवारे इन्स्टिीट्यूट मधील आवश्यक अभ्यासक्र म सुरू करावेत. शिवाय मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुरू असलेले इतरही अभ्यासक्र म चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करावेत, रत्नागिरीच्या धर्तीवर रेल्वे रिसर्च सेंटर सुरू करण्याची मागणी यावेळी महापौर यांनी केली. याबाबत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचीही भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
या व्यतिरिक्त परिक्षेत्राअंतर्गत उपलब्ध असलेल्या जागेत वसतीगृह उभारणे तसेच आवश्यक मूलभुत सेवा सुविधा उपलब्ध करु न देणे व येथील समस्या तातडीने सोडविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
उपकेंद्राअंतर्गत आवश्यक असलेले प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांची तातडीने भरती करणेबाबतचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी संगणक कक्ष, वर्ग खोल्या, लायब्ररी याचीही पाहणी केली.

Web Title: Syllabus through Sub-Centers for Students