शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचीही दिवाळी गोड! स्वजिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा, नव्याने अर्ज करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 08:08 IST

अनेक शिक्षकांनी स्वजिल्ह्यात जागा नसल्याने अर्ज केला नव्हता किंवा उपलब्ध जागेनुसार इतर जिल्ह्यांचे पर्याय दिले होते. 

मुंबई : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नवीन भरतीपूर्वी राबविण्यात येईल. तसेच २०२२ मध्ये केलेल्या अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात येईल. तसा शासन आदेश ३ नोव्हेंबर रोजी उपसचिव तुषार महाजन यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. 

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा सध्या राबवत असून, २०२२ मध्ये ऑनलाइन अर्ज केलेल्या शिक्षकांचाच विचार यात केला जाणार होता.  त्यावेळी अनेक शिक्षकांनी स्वजिल्ह्यात जागा नसल्याने अर्ज केला नव्हता किंवा उपलब्ध जागेनुसार इतर जिल्ह्यांचे पर्याय दिले होते. 

नव्याने अर्ज करा किंवा निर्णय बदलण्याची संधीअर्ज न केलेल्यांना अर्ज करण्याची संधी द्यावी आणि ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांना त्यात बदल करण्याची संधी द्यावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड व नीलेश देशमुख यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत केली होती. ती पूर्ण करण्याचे आश्वासन त्यावेळी केसरकर यांनी दिले होते. त्याची परिपूर्ती या आदेशाने झाली आहे. आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबवून २०२२ मध्ये अर्ज केलेल्यांना त्यात बदल करण्याची संधी दिली जाईल. तसेच अर्ज न केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळेल. शिक्षणमंत्र्यांनी याला मान्यता दिली असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

आंतरजिल्हा बदलीसाठी सहावा टप्पा सुरू- काही शिक्षकांचे संवर्ग बदलले आहेत, तर काही शिक्षकांच्या स्वत:च्या जिल्ह्यातील जागा आता रिक्त झाल्या आहेत.- शासनाच्या या नवीन आदेशामुळे शिक्षकांना अर्जात बदल करण्याची किंवा नव्याने अर्ज करण्याची संधी मिळाली. - ही आम्हाला शासनाने दिलेली दिवाळी भेट असल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ही तर दिवाळी भेट शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा विषय ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला आहे.शिक्षक सहकार संघटनेने यासाठी वारंवार आंदोलन केले. दिवाळीच्या तोंडावर या आंदोलनाला यश आले. 

टॅग्स :Teacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र