स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन सिडनीत

By Admin | Updated: March 20, 2017 03:45 IST2017-03-20T03:45:37+5:302017-03-20T03:45:37+5:30

जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक मंच या संस्थेतर्फे यंदा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन’ सिडनी येथे आयोजित करण्यात येणार

Swatantryaveer Savarkar World Summit in Sydney | स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन सिडनीत

स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन सिडनीत

मुंबई : जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक मंच या संस्थेतर्फे यंदा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन’ सिडनी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे. २८ मे २०१७ रोजी हे संमेलन सिडनी येथे पार पडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सिडनी येथे चौथे स्वा. सावरकर विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सिडनी येथील महाराष्ट्र मंडळ हे या संमेलनाचे निमंत्रक असून या संमेलनामध्ये सावरकरप्रेमी मंडळींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक मंचातर्फे करण्यात आले आहे. सर्वप्रथम जून २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हे संमेलन आयोजित करण्यात आले. पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन मॉरिशस येथे पार पडले. २०१२ साली दुबई येथे दुसऱ्या विश्व संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर तिसरे संमेलन लंडन येथे भरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Swatantryaveer Savarkar World Summit in Sydney