शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

पवारांच्या दबावामुळे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होणार नाही, 'त्या' पोस्टवर कोल्हेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 7:35 PM

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

ठळक मुद्देस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शरद पवारांच्या दबावामुळे संभाजी मालिका बंद केली, असं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटल्याचं व्हायरल करण्यात आलं आहे. या व्हायरल पोस्टवरून अमोल कोल्हे  संतापले असून, त्यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.  

मुंबईः स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एबीपी माझ्याच्या नावानं ही पोस्ट व्हायरल होत आहे. शरद पवारांच्या दबावामुळे संभाजी मालिका बंद केली, असं या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटल्याचं व्हायरल करण्यात आलं आहे. या व्हायरल पोस्टवरून अमोल कोल्हे  संतापले असून, त्यांनी पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात बदनामी करण्यात आली असून, आदरणीय पवारसाहेबांना या प्रकरणात गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. पवारसाहेबांचा कलाक्षेत्राविषयीचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी राष्ट्रवादीत आल्यापासून कधीही पवार साहेबांनी हे दाखवा आणि हे दाखवू नका, असं सांगितलेलं नाही. केवळ वडिलधाऱ्यांच्या भूमिकेतून काही अडचण तर नाही ही चौकशी नक्की केली. त्यामुळे ज्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवल्या जात आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही.दररोज रात्री 9 वाजता सोमवारी ते शनिवारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुरूच राहणार आहे. कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होतेय, या बातमीत कुठलंही तथ्य नाही. जे कोणी अशा बातम्या पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, अशा उपद्रवी मूल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मी महाराष्ट्र पोलिसांकडे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडेसुद्धा ही मागणी केलेली आहे. अशा समाजकंटकांना आळा बसला पाहिजे. संभाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवण्यासाठी ही मालिका सुरू असून, ती अव्याहतपणे सुरूच राहणार आहे, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं आहे. भाजपानं ही पोस्ट व्हायरल केल्याची चर्चा आहे. त्यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा अशा बनावट क्लिप व्हायरल करत नसते. मालिक बंद करण्यासंदर्भात काही जणांची मतं असू शकतात. परंतु भाजपा असं काहीही  करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.   

टॅग्स :Swarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजी