विरार रेल्वे स्थानकावर भरदिवसा प्रवाशाची हत्या
By Admin | Updated: April 11, 2016 12:12 IST2016-04-11T12:12:43+5:302016-04-11T12:12:43+5:30
माथेफिरु तरुणाने चाकूने भोसकून एका प्रवाशाची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे

विरार रेल्वे स्थानकावर भरदिवसा प्रवाशाची हत्या
>ऑनलाइन लोकमत -
विरार, दि. ११ - रेल्वे स्थानकावर भरदिवसा प्रवाशाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. माथेफिरु तरुणाने चाकूने भोसकून एका प्रवाशाची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तरुणाचं नाव महेंद्र कुमार पाल असून तो मनोरुग्ण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र भरदिवसा अशा प्रकारे रेल्वे स्थानकात हत्या झाल्याने प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.