शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

संमेलनात घुमले ‘अधिकार’वाणीचे सूर!

By admin | Updated: February 20, 2016 03:33 IST

नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष फय्याज यांनी अध्यक्षपदाला अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, तर नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हे पद एका वर्षापुरते शोभेचे असता कामा नये,

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगरी (ठाणे) : नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष फय्याज यांनी अध्यक्षपदाला अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, तर नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हे पद एका वर्षापुरते शोभेचे असता कामा नये, असा सूर आळवला. मात्र अधिकार हे मागून मिळत नाहीत, तर ते गाजवायचे असतात, अशा शब्दांत उद्घाटक व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उभयतांना ‘अधिकार’वाणीचा मंत्र दिला. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९६व्या नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारलेल्या भव्य स्वर्गीय मामा पेंडसे मंचावर संपन्न झाला. तत्पूर्वी लेखक श्याम फडके यांच्या निवासस्थानापासून निघालेली नाट्यदिंडी गडकरी रंगायतनमार्गे स्टेडियमवर पोहोचली. गवाणकर यांना फय्याज यांनी सूत्रे सोपवताना अध्यक्षांचा गळ्यातील पदक आणि पुणेरी पगडी प्रदान केली. त्यानंतर फय्याज म्हणाल्या, की संमेलनाध्यक्ष हा १० दिवसांच्या गणपतीप्रमाणेच असतो. संमेलनानंतर त्याला काही अधिकार नसतो. शासनाचे दोन पुरस्कार निवडण्याचे अधिकार सोडले तर हे पद केवळ शोभेचे असते, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे मला वर्षभर काहीही करता आले नाही. हे पद किमान दोन वर्षेतरी असावे, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक घेऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. उद्धव ठाकरे यांनी संमेलनाध्यक्षपद दोन वर्षे करण्याची मागणी मान्य आहे का, असा सवाल जाहीरपणे मोहन जोशी यांना करताच, त्यांनी त्यास होकारार्थी उत्तर दिले. मात्र असा झटपट निर्णय अशक्य असल्याची कुजबुज लागलीच सुरू झाली. > नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद हे उभ्या नाट्यसृष्टीचे प्रतिनिधित्व करणारे असते, असे मी मानतो. केवळ एका वर्षापुरते शोभेचे ते असता कामा नये. एक वर्षात नियोजित संकल्प पूर्णपणे आकाराला येतातच, असे नाही़ परंतु कुठेतरी सुरुवात निश्चित होईल. राज्य सरकार व नाट्यपरिषदेने संमेलनाध्यक्षांच्या ‘भटकंती’स सुसह्य होईल, अशी व्यवस्था केल्यास देशभरातील नाट्यचळवळींशी संवाद साधणे शक्य होईल. - गंगाराम गवाणकर, संमेलनाध्यक्ष > अधिकार गाजवायचे असतात -उद्धव ठाकरेसध्या महापौरपद अडीच वर्षे आहे. त्या पदावर बसणारे अनेक जण मला अधिकार नाहीत व पुरेसा कालावधी मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करतात. पण माझे असे मत आहे, की अधिकार असे मागून मिळत नाहीत, ते गाजवायचे असतात. फय्याजताई, मोहन जोशी इथेच बसले आहेत. अजून काही करून घ्यायचे असेल तर सांगा, अशी टिप्पणी ठाकरे यांनी करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.