विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दावा

By Admin | Updated: July 21, 2014 02:48 IST2014-07-21T02:48:11+5:302014-07-21T02:48:11+5:30

विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास आमची तयारी असून या जागांसाठी महायुतीकडे दावा केला जाईल,

Swabhimani Shetkari Sanghatana claims claim in 9 seats in Vidarbha | विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दावा

विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दावा

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास आमची तयारी असून या जागांसाठी महायुतीकडे दावा केला जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. चिखली येथील एल्गार मेळाव्यानिमित्त खा. राजू शेट्टी विदर्भाच्या दौऱ्यावर आले. विदर्भातील चिखली, खामगाव, बाळापूर, कारंजा लाड, वणी, वरूड, रामटेक, देवळी आणि काटोल हे ९ मतदारसंघ लढण्यास सक्षम उमेदवार
संघटनेकडे असल्याचे खा. शेट्टी यांनी या वेळी सांगितले. विदर्भातील ९ जागांसह राज्यातील ६५ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे यासंदर्भातही संघटना महायुतीशी चर्चा करणार आहे. महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana claims claim in 9 seats in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.