स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी बस फोडल्या
By Admin | Updated: August 2, 2016 05:22 IST2016-08-02T05:22:59+5:302016-08-02T05:22:59+5:30
महामोर्चाला शासनाने परवानगी नाकारल्याच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री येथील संभाजीनगर एस. टी. आगारातील आठ बसेसवर दगडफेक

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी बस फोडल्या
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आ. नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेतर्फे मुंबईत बुधवारी काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला शासनाने परवानगी नाकारल्याच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री येथील संभाजीनगर एस. टी. आगारातील आठ बसेसवर दगडफेक करून तोडफोड केली.
घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शहरातील महत्त्वाच्या चौकात, बसस्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत होता. जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्ते रात्री नऊच्या सुमारास संभाजीनगर बसस्थानक येथे जमले. अचानक त्यांनी एसटी बसवर दगडफेक करीत तोडफोड केली. त्यात कर्नाटक व महाराष्ट्राच्या प्रत्येकी
चार बसचा समावेश आहे. पोलीस येईपर्यंत कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाकडे मोर्चा वळविला. (प्रतिनिधी)