याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती

By Admin | Updated: June 3, 2014 01:32 IST2014-06-03T01:32:34+5:302014-06-03T01:32:34+5:30

मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहीमचा प्रमुख साथीदार याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

Suspension of Yakub Memon hanged | याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती

याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती

>नवी दिल्ली : मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहीमचा प्रमुख साथीदार याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. न्या. जे. एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या पीठाने मेमनच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकार आणि इतर यंत्रणांना नोटीस बजावली असून, तोर्पयत फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाने मेमनची फेरविचार याचिका घटनापीठाच्या विचारार्थ पाठवली आहे. माङया याचिकेवरील सुनावणी न्यायाधीशांच्या चेम्बरमध्ये न घेता खुल्या न्यायालयात घ्यावी, अशी मागणी मेननने केली आहे. मेमनचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दहा दिवसांपूर्वी फेटाळला होता. मुंबई साखळी स्फोटांचा अन्य सूत्रधार टायगर मेमन याचा याकूब हा भाऊ आहे.

Web Title: Suspension of Yakub Memon hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.