कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला स्थगिती
By Admin | Updated: July 27, 2016 16:18 IST2016-07-27T16:18:48+5:302016-07-27T16:18:48+5:30
हद्दवाढी विरोधात कोल्हापूरच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ ही अन्यायकारक असल्याने ती त्वरीत रद्द करावी.

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला स्थगिती
ऑलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी विरोधात कोल्हापूरच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ ही अन्यायकारक असल्याने ती त्वरीत रद्द करावी.
या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या. या मध्ये चंद्रदीप नरके (आमदार, शिवसेना),अमल महाडीक (आमदार, भाजप) सुजीत मिणचेकर (आमदार, शिवसेना) यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला स्थगिती दिली आहे. ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय घेणार असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.