भायखळा कारागृहातील दोन अधीक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:56 AM2017-08-02T04:56:34+5:302017-08-02T04:56:38+5:30

मुंबईच्या भायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणात कारागृहाचे कार्यकारी अधीक्षक घरबुडवे व अधीक्षक इंदुलकर यांना निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली.

Suspended two Superintendents of Byculla Jail | भायखळा कारागृहातील दोन अधीक्षक निलंबित

भायखळा कारागृहातील दोन अधीक्षक निलंबित

Next

मुंबई : मुंबईच्या भायखळा कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणात कारागृहाचे कार्यकारी अधीक्षक घरबुडवे व अधीक्षक इंदुलकर यांना निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. तर, स्वाती साठे यांची सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाºयाकडून चौकशी केली जाईल, असे जाहीर केले.
मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाच्या तपासातील त्रुटींवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्र मक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक (कारागृहे) स्वाती साठे यांना त्वरित निलंबित करून सहआरोपी करण्याची मागणी मुंडे यांनी केली. सुनील तटकरे, संजय दत्त, जयवंत जाधव, विद्या चव्हाण, भाई जगताप आदी सदस्यांनी मुंडे यांच्या मागणीचे समर्थन केले. तर नीलम गोºहे यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.
गृहाराज्यमंत्री पाटील यांनी स्वाती साठे यांची सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाºयाकडून चौकशी केली जाईल, असे जाहीर केले. मात्र, साठे यांना सहआरोपी करण्यास नकार दिला.

Web Title: Suspended two Superintendents of Byculla Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.