ठाणे कारागृह अधीक्षक निलंबित

By Admin | Updated: September 3, 2016 06:13 IST2016-09-03T06:13:45+5:302016-09-03T06:13:45+5:30

मध्यवर्ती कारागृहातील महिला कॉन्स्टेबलच्या विनयभंग प्रकरणी ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केले.

Suspended Thane Prison Superintendent | ठाणे कारागृह अधीक्षक निलंबित

ठाणे कारागृह अधीक्षक निलंबित

ठाणे : मध्यवर्ती कारागृहातील महिला कॉन्स्टेबलच्या विनयभंग प्रकरणी ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केले. याच दरम्यान ठाणे शहर पोलिसांनीही त्यांच्याविरोधात चौकशी करण्यासंदर्भात कारागृह विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच शुक्रवारी कारागृहात जाऊनही चौकशी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०१२ मध्ये ते येरवडा प्रशिक्षण केंद्रात प्रिन्सिपॉल असतानाही त्यांच्याविरोधात १७ महिलांनी अशीच तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Suspended Thane Prison Superintendent