पेट्रोल पंप चालकांचा संप स्थगित

By Admin | Updated: August 25, 2014 19:06 IST2014-08-25T19:03:03+5:302014-08-25T19:06:16+5:30

आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला पेट्रोल पंपचालकांचा संप स्थगित करण्यात आला आहे.

Suspended the deal of petrol pump drivers | पेट्रोल पंप चालकांचा संप स्थगित

पेट्रोल पंप चालकांचा संप स्थगित

ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. २५ - आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला पेट्रोल पंपचालकांचा संप स्थगित करण्यात आला आहे. 
एक राज्य, एक कर, एक दर  या  प्रमुख मागणीसाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल पंप बेमुदत बंद 
करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोलपंपावर लांबलचक रांगा लागल्या दिसल्या होत्या. परंतू  सोमवारी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पेट्रोल पंप चालकांसोबत केलेल्या मध्यस्थीनंतर पंपचालकांनी संप स्थगित केला आहे. राज्यात भाजपाची सत्ता आल्यास एलबीटी रद्द करू असे आश्वासन  विनोद तावडे यांनी यावेळी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई वगळता राज्यभरात बेमुदत संप घोषित करण्यात आला होता. स्थानिक संस्थांच्या करापोटी इंधन महाग होत असल्याची भूमिका घेत हा कर रद्द करण्याची पेट्रोलपंप धारकांची मागणी होती. 

 

Web Title: Suspended the deal of petrol pump drivers