गावठी बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित कोल्हापुरातून ताब्यात
By Admin | Updated: September 2, 2014 01:59 IST2014-09-02T01:59:04+5:302014-09-02T01:59:04+5:30
आठ दिवसांपूर्वी शाहू जकात नाक्याजवळ झालेल्या गावठी बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गावठी बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित कोल्हापुरातून ताब्यात
कोल्हापूर : आठ दिवसांपूर्वी शाहू जकात नाक्याजवळ झालेल्या गावठी बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून मंगळवारी घटनेमागचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
एटीएस पथकासह स्थानिक पोलिसांच्या समन्वयामुळे संशयित जेरबंद करता आला. एटीएसचे प्रमुख व अप्पर पोलीस महासंचालक हिमांशू रॉय, पुणो एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह स्थानिक पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर हातगाडीचालक श्रीधर कोठावळे व मनोज परब यांची पोलिसांनी चौकशी केली होती. गावठी बॉम्बस्फोटप्रकरणी तपास सुरू आहे. लवकरच अधिक माहिती दिली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)