शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 17:36 IST

शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेत मी धंगेकर आणि अंधारे यांना नोटीस बजावणार असल्याचं म्हटलं आहे.

Shambhurj Desai ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं केलेले गैरकृत्य चव्हाट्यावर आले. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुराही रंगत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील एक्साइज कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. तसंच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. यावरून आता देसाई यांनी आक्रमक भूमिका घेत मी धंगेकर आणि अंधारे यांना नोटीस बजावणार असल्याचं म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आज शंभूराज देसाई म्हणाले की, "आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जाब विचारला. वास्तविक पुण्यातील घटनेनंतर उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. परंतु धंगेकर आणि अंधारे यांनी आंदोलन करताना हातात पैसे घेून आंदोलन केले आणि माझा फोटो असलेले खोके हातात घेतले होते. याप्रकरणी मी त्यांना नोटीस बजावणार आहे. पुढील ३ दिवसांत त्यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा मी कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेणार आहे," असा इशारा देसाईंनी दिला आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात नेमकं काय घडलं होतं?

पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. त्यांच्याबरोबर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा होत्या. धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरुन चांगलेच सुनावले आहे. पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक यांच्याकडून दर महिन्याला किती हजार, लाख घेतात. चक्क याची यादीच वाचून दाखवली. तुम्ही पाप करताय, खोट बोलू नका असे म्हणत दर महिन्याला ८०, ९० लाख हप्ते घेता असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यात धंगेकरांनी पोलिसांची नावेही वाचून दाखवली.   "कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी ४ वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही.  या सगळ्या प्रकणामध्ये आम्ही पुणेकरांना नेस्तनाबुत होऊ देणार नाही. प्रत्येक ठिकाणी बारमध्ये वसुली केली जात आहे. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि आम्ही आता गप्प बसणार नाही. सरकारने काहीही करु द्या, आम्ही रस्त्यावर उतणार," असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला होता.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईravindra dhangekarरविंद्र धंगेकरSushma Andhareसुषमा अंधारेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात