शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
5
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
6
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
7
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
8
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
9
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
10
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
11
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
18
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
19
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
20
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता

"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 12:59 IST

Ajit Pawar Anjali Krishna Sushma Andhare News: करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक कारवाई करण्यासाठी आलेल्या असताना थेट अजित पवारांना कॉल करणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ajit Pawar Sushma Andhare Anjali Krishna: करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कॉल करून दम दिला. कारवाई थांबवली. पण, ज्या व्यक्तीने अजित पवारांना कॉल केला होता, त्याच्यामुळे हे प्रकरण आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या व्यक्तीचे नाव बाबा जगताप असून, ते संरपच असल्याचे समोर आले आहे. ग्राम पंचायत कार्यालयात ते गांजा सेवन करत असल्याचा दावा शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

सुषमा अंधारे म्हणाल्या, "दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच. याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं. दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली."

"७० कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे मागितली, तर..." "अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसांना तरी तोंड दाखवायला जागा राहील का ? किरीटचं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे", अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना डिवचलं. 

"जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनो न् महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे", अशी टीका सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर केली आहे. 

अजित पवारांना कॉल केला अन् अंजली कृष्णा यांना दिला मोबाईल

करमाळ्यातील कुर्डू गावात घडलेल्या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार टीकेचे धनी ठरले. अजित पवारांनी याबद्दल खुलासा करत पडदा टाकला. पण, बाबा जगताप यांचा नवा व्हिडीओ समोर आल्याने प्रकरणाला नवी फोडणी मिळाली आहे. 

अंजली कृष्णा यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीच या व्हिडीओने पंचाईत झाली आहे. जो व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आहे, त्यात बाबा जगताप चिलीमद्वारे धूम्रपान करताना दिसत आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSushma Andhareसुषमा अंधारेPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेसViral Videoव्हायरल व्हिडिओ