शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"अजितदादांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिलेल्या लढ्याला यश आलं"; सुषमा अंधारेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 10:44 IST

महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा लढल्याबद्दल आभार अशी टीका अजित पवारांवर करण्यात आलीय.

Sushma Andhare Slam Ajit Pawar: दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडला असून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांना दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरणाने हा दिलासा दिला आहे. २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्तांप्रकरणी शुक्रवारी अजित पवारांना क्लिनचिट मिळाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोप फेटाळले. दुसरीकडे, ठाकरे गटाने अजित पवारांना मिळालेल्या दिलाश्यावरुन खोचक टोला लगावला आहे.  महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा लढल्याबद्दल आभार अशी टीका अजित पवारांवर करण्यात आलीय.

महायुती सरकारच्या स्थापनेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला. २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्याच्या सर्व मालमत्ता शुक्रवारी मंजूर करण्यात आल्या. अजित पवारांविरोधातील सर्व दावे दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने फेटाळून लावले आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी अजितदादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

"कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेच त्यांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सहीसलामत त्यांना परत केली. खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अजित पवारांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे. हा लोकशाहीच्या बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्याआधी सुद्धा राहुल कणाल, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, भावना गवळी या काही चित्र विचित्र लोकांनी मोठ्या ताकदीने दिला. या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता. त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भाजपचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा," असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयकर विभागाने अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते ज्यात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी मालकीच्या काही मालमत्तेचा कथित संबंध असलेली काही कागदपत्रे सापडली होती. मात्र, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत न्यायाधिकरणाने हे दावे फेटाळून लावले. अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा आणि मुलगा पार्थ अजित पवार यांची बाजू मांडणारे वकील प्रशांत पाटील यांनी न्यायाधिकरणासमोर युक्तिवाद केला की, त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. ॲडव्होकेट पाटील यांनी बेनामी व्यवहार बंदी कायद्याच्या योजनेचा दाखला देत पवार कुटुंब निर्दोष असून त्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय कारवाईत खेचता येणार नाही, असे न्यायाधिकरणाला सांगितले. ५ नोव्हेंबर, २०२४ रोजी, न्यायाधिकरणाने प्राप्तिकर विभागाने दाखल केलेले अपील फेटाळून, पूर्वीचा निर्णय कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी यापूर्वी जप्त केलेल्या  मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपाIncome Taxइन्कम टॅक्स