शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

“राज ठाकरेंची भूमिका जनतेला पटणारी नाही, आपण जिंकणार ही त्यांना खात्री नाही”: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 10:55 IST

Sushma Andhare News: एका ८४ वर्षांच्या व्यक्तीला अन् अत्यंत घायाळ वाघाला हरवायला एवढी सगळी ताकद लावली जातेय, म्हणजे आपण जिंकू शकतो, हा विश्वास त्यांना राहिलेला नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

Sushma Andhare News:राज ठाकरे यांच्या व्याख्यानाचा काही परिणाम होणार नाही. ज्या अर्थी एवढे सगळे लोक एका ८४ वर्षांच्या व्यक्तीला आणि एका अत्यंत घायाळ वाघाला हरवण्यासाठी एवढे सगळे ताकद लावतात, त्या अर्थी आपण जिंकू शकतो, याचा विश्वास त्यांना राहिलेला नाही. महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाही. राज ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका महाराष्ट्रातील जनतेला पटणारी नाही, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. 

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांच्या निर्णयावर महाविकास आघाडी आणि महायुतीतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

राज ठाकरेंची भूमिका जनतेला पटणारी नाही, आपण जिंकणार ही त्यांना खात्री नाही

एकीकडे राजकीय व्यभिचाराला समर्थन नाही, असे म्हणताना तुम्ही ज्यांनी वाया सुरत-गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचे राजकारण करत इथे सरकार बदलले, अशांना पाठिंबा देता. एकीकडे तुम्ही विचारांची भाषा करता आणि दुसरीकडे विचार बदलून टाकता. महाराष्ट्रातील जनता, जो कोणी संविधान प्रेमी आहे, त्याला ही भूमिका निश्चितपणे पटणारी नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा एकूण भाजपातील लोक असतील, हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे, त्यांचा जो मूळ पिंड आहे, तो दाखवत आहेत. त्यांचा जिथे स्टेटमेंट आहे, सभेमध्ये त्यांनी केलेले हे वक्तव्य हे भाजपाच्या मूळ संस्कृतीचे खरे प्रदर्शन आहे, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेRaj Thackerayराज ठाकरेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४