Sushant Singh Rajput Suicide: सुशांतसिंहच्या ‘त्या’ पूजाविधीचा व्हिडीओ व्हायरल; उपस्थित पुजारी नाशिकमधले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 07:18 AM2020-08-11T07:18:22+5:302020-08-11T07:19:13+5:30

‘ते’ पुजारी भूमिगत : त्र्यंबकेश्वरमधील पुजारी असल्याची चर्चा

Sushant Singh Rajput Suicide Video of Sushant Singh performing pooja goes viral | Sushant Singh Rajput Suicide: सुशांतसिंहच्या ‘त्या’ पूजाविधीचा व्हिडीओ व्हायरल; उपस्थित पुजारी नाशिकमधले?

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतसिंहच्या ‘त्या’ पूजाविधीचा व्हिडीओ व्हायरल; उपस्थित पुजारी नाशिकमधले?

googlenewsNext

नाशिक : सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूमागील गूढ अद्याप उकललेले नाही. दरम्यान, सुशांतने आपल्या कुटुंबासह वांद्र्यातील घरी केलेल्या पूजाविधीचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत दिसणारे पंडित त्र्यंबकेश्वरमधील असल्याच्या चर्चेला सोमवारी सकाळपासून उधान आले. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने मात्र या बाबीचा इन्कार केला असून, त्र्यंबकनगरीचा अन् त्या पूजाविधीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत धार्मिकनगरीची बदनामी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी स्पष्ट केले आहे.

व्हायरल झालेला व्हीडीओ सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांती पूजाविधी केल्याचा असल्याची चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पूजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते. कारण त्या पूजेला स्थानमहात्म्य प्राप्त आहे, असे गायधनी यांनी सांगितले. सुशांतच्या घरी नेमकी कोणती पूजा झाली? याबाबतदेखील खात्री पटू शकलेली नाही. कारण रुद्राभिषेकची पूजा झाल्याचेही दुसरीकडे बोलले जात आहे.

‘यू-ट्यूब’वरून व्हिडिओ रद्द
सुशांतसिंहने केलेल्या कुटुंबासमवेतच्या पूजाविधीच्या व्हिडिओची यू-ट्यूब लिंक व्हायरल झाली. कालांतराने मात्र तो व्हिडिओ रद्द करण्यात आला. संध्याकाळी या लिंक द्वारे व्हिडिओ दिसणे बंद झाले.

व्हिडिओत दिसणाऱ्या परप्रांतीय पूजाºयाचा आणि त्र्यंबकेश्वरचा काहीही संबंध नाही. लाखो रुपये घेऊन कुठलीही पूजा होत नसते. - प्रशांत गायधनी,
अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर

Web Title: Sushant Singh Rajput Suicide Video of Sushant Singh performing pooja goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.