शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले ७६ प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 00:59 IST

भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाडच्या हद्दीतील दुसऱ्या अरुंद वळणावर एसटीचे वळण पूर्णपणे न बसल्याने बस खोल दरीत कोसळता कोसळता वाचली.

भोर : भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाडच्या हद्दीतील दुसऱ्या अरुंद वळणावर एसटीचे वळण पूर्णपणे न बसल्याने बस खोल दरीत कोसळता कोसळता वाचली. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील ७६ प्रवाशांचे प्राण वाचले. अन्यथा बस सुमारे दीड ते दोन हजार फूट खोल दरीत पडून मोठा अनर्थ घडला असता. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.मोहन उत्तमराव बांदल (वय ५४, रा. महुडे बुद्रुक, ता. भोर) असे चालकाचे नाव आहे. भोर आगाराची बस (एमएच १४ बीटी ३८४७) शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास स्वारगेट येथून महाडला जाण्यास निघाली. बसमध्ये सुमारे ७६ प्रवासी होते. ही बस भोर आगारातून महाडच्या दिशेने निघाली होती. वरंध घाटातील वाघजाईदेवी मंदिराच्या पुढील बाजूला महाड तालुक्याच्या हद्दीतील दुसºया तीव्र उताराच्या व अरुंद असलेल्या वळणावर बस आली. एका बाजूला चारी काढलेली आणि दुसºया बाजूला खोल दरी त्यामुळे चालकाला व्यवस्थित वळण घेता आले नाही. समोरचा कठडाही कमी उंचीचा असल्याने गाडी खाली गेल्यास सुमारे दीड ते दोन हजार फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे चालकाच्या अंगावर काटा उभा राहिला होता.घाटरस्ता धोकादायकचप्रसंगाचे भान ठेवत चालकाने गाडी कठड्याजवळ थांबविली. तत्काळ गाडीतील ७६ प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. भोर-महाड हा रस्ता अत्यंत अरुंद असून वरंध घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत. अनेक ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत. दिशादर्शक फलक नाहीत. झाडेझुडपे वाढलेली आहेत. यामुळे वळणावरच्या गाड्या दिसत नाहीत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळAccidentअपघात