शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांत पूर्ण करणार मराठा समाजाचे सर्वेक्षण, २ लाख प्रगणक तपासणार मागासलेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:09 IST

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण होऊन मागासवर्ग आयोगाचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच विशेष अधिवेशन घेतले जाईल. त्यात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला जाईल.

मुंबई : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर कामाला लागले असून, राज्यभरात दोन लाखांहून अधिक प्रगणक सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करून सात दिवसांत अहवाल देणार आहेत. यासाठी त्यांना हॅण्डहेल्ड डिव्हाइस दिले जाणार आहे. हे प्रगणक जिल्हा, तालुका, गावपातळीवर फिरून यासंदर्भातील माहिती गोळा करून अहवाल देणार आहेत. 

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडूनही पावले उचलली जात आहेत. मराठ्यांचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आवश्यक माहिती लागणार आहे. ती गोळा करण्यासाठी प्रगणक नेमण्यात येणार आहेत. या प्रगणकांना वेगाने प्रशिक्षण देण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व आयुक्त, महापालिका यांच्याकडून मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जाणार आहेत. मोठ्या जिल्ह्यांकरिता दोनपेक्षा अधिक मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जातील. प्रगणकांत वाढ करण्याची मुभा जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. 

अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशनजानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात सर्वेक्षण पूर्ण होऊन मागासवर्ग आयोगाचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच विशेष अधिवेशन घेतले जाईल. त्यात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी आणला जाईल.

-  राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणासाठी प्रश्नावली अंतिम केली आहे. या प्रश्नावली सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महानगरपालिकांना पाठविण्यात आलेली आहे.-  यासाठी गोखले इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेकडून सर्वेक्षण कामकाजासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून, हे सॉफ्टवेअर युजर फ्रेंडली असेल. हे सॉफ्टवेअर हॅण्डहेल्ड डिव्हाइसमध्ये असेल. यातील प्रश्नावलीनुसार सर्वेक्षण करून त्याची उत्तरे सॉफ्टवेअरमध्ये भरायची आहेत.-  तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल यांचे सहकार्य व गरज पडल्यास पोलिस आयुक्त पोलिस अधीक्षकांना आवश्यक बंदोबस्त पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण