सुरेशदादा जैन यांना वैद्यकीय रजा मंजूर
By Admin | Updated: July 19, 2014 02:31 IST2014-07-19T02:31:28+5:302014-07-19T02:31:28+5:30
जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आमदार सुरेशदादा जैन यांना मुंबईत वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी विशेष न्यायालयाने १७ दिवसांची रजा मंजूर केली आहे.

सुरेशदादा जैन यांना वैद्यकीय रजा मंजूर
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आमदार सुरेशदादा जैन यांना मुंबईत वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी विशेष न्यायालयाने १७ दिवसांची रजा मंजूर केली आहे. सहा आॅगस्टला सायंकाळी त्यांना पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागणार आहे.
सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज सुरू आहे. आमदार सुरेशदादा जैन यांनी वैद्यकीय उपचार आणि मुलाकडे धार्मिक कार्यक्रमाला हजर राहता यावे, यासाठी २० जुलै ते २० आॅगस्ट अशी एक महिन्यांची रजा मिळावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. सरकारी वकील शामकांत पाटील यांनी त्यास हरकत घेतली.
बचाव पक्षाच्या वकीलांनी भेटीची वेळ घेतलेल्या डॉ. पिल्लई, डॉ. रईस, डॉ. भट्टाचार्य, डॉ. मुन्शी, डॉ. शहा यांच्या नावांची यादी न्यायालयात सादर केली.
त्यानंतर न्यायालयाने सुरेशदादा जैन यांना २१ जुलै ते ६ आॅगस्टपर्यंत पोलीस बंदोबस्त अनिवार्य करत रजा मंजूर केली. त्यांना २१ तारखेला सकाळी आठ वाजता येथून पोलीस बंदोबस्तात जावे लागेल आणि ६ आॅगस्टला सायंकाळी धुळे कारागृहात हजर व्हावे लागेल, असे सरकारी वकीलांनी सांगितले. (प्रतिनिधी)