सुरेशदादांनी निवडणूक लढवावी, संजय राऊत यांचा आग्रह, आर.ओ. पाटील लोकसभेचे उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:23 IST2018-01-13T02:23:28+5:302018-01-13T02:23:59+5:30
जळगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना केला. राऊत यांनी सुरेशदादा यांची भेट घेऊन अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. तर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार आर.ओ. पाटील यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाचही झाले.

सुरेशदादांनी निवडणूक लढवावी, संजय राऊत यांचा आग्रह, आर.ओ. पाटील लोकसभेचे उमेदवार
जळगाव : जळगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना केला. राऊत यांनी सुरेशदादा यांची भेट घेऊन अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. तर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार आर.ओ. पाटील यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाचही झाले.
उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून खा. राऊत जळगाव जिल्ह्यात आले आहेत. महापौर ललित कोल्हे यांनी आपणास महापौरपद दादांच्या आशीर्वादाने मिळाल्याचे सांगताच ‘आम्हालाही दादांचा आशीर्वाद हवा आहे’ असे राऊत म्हणाले.
आर.ओ. पाटील हे लोकसभेसाठी उभे राहतील, असे सुरेशदादांनी सांगताच विधानसभा तुम्हीच लढवावी, अशी इच्छा राऊत यांनी व्यक्त केली. या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर.ओ. पाटील आदींची उपस्थिती होती.
दादांचा आशीर्वाद हवा
विधानसभा दादांनी लढवावी़ आम्हालाही दादांचा आशीर्वाद हवा आहे, असेही संजय राऊत म्हणाले़