शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 09:51 IST

Pune Porsche Accident Update: एवढा गंभीर गुन्हा करूनही आरोपी बाहेर आला, अल्पवयीन असला तरी त्याला सोडविण्यासाठी काय काय घडले याची चर्चा रंगली आहे.

पुण्यातील बिल्डर बाळाने मध्यरात्री दारुच्या नशेत दोन बळी घेतले. नोंदणी नसलेली पोर्शे कार बेदरकारपणे चालवून, दोघांना आयुष्यातून उठवून देखील या अब्जाधीश बिल्डर बाळाला १५ तासांतच शुल्लक अटींवर जामीन मिळाल्याने पुण्यातच नाही तर राज्यभरातून या रेड कार्पेटवर टीका होऊ लागली आहे. यामुळे राज्य सरकारही सावध झाले असून या हायप्रोफाईल केसमध्ये जामीन कसा मिळाला याचे एकेक किस्से समोर येऊ लागले आहेत. 

बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...

एवढा गंभीर गुन्हा करूनही आरोपी बाहेर आला, अल्पवयीन असला तरी त्याला सोडविण्यासाठी काय काय घडले याची चर्चा रंगली आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट पाच तासांनी केली. यामुळे ती निगेटिव्ह आली. यामुळे बाहेर माध्यमांना पोलीस आयुक्त जरी तो दारुच्या नशेत होता असे सांगत असले तरी कोर्टात सांगू शकत नव्हते. याचाच फायदा या आरोपीला जामीन मिळण्यास झाला. यावरून पुणे पोलिसांवर पुणेकर नागरिकांचा रोष वाढू लागला आहे. हे प्रकरण शेकतेय असे दिसताच पोलिसांनी आरोपीची रक्त चाचणी केली ती पॉझिटीव्ह आली आहे. 

आता बाल न्यायालयात काय झाले ते देखील समोर येऊ लागले आहे. आजवर फक्त त्या आरोपीला न्यायाधीशांनी निबंध लिही, पंधरा दिवस वाहतुकीचे नियमन कर अशा अटी घातल्या आहेत, हेच सांगितले जात होते. परंतु या सुनावणीवेळी या आरोपीच्या आजोबाने आपला प्रतापी नातू अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून दूर राहिल अशी हमी दिल्याने जामीन मिळाल्याचे समोर आले आहे. 

त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली यांनी या मुलाच्या वाईट वागण्यामुळे, त्रास दिल्याने आपल्या मुलाला त्रास झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या मुलाकडे जर वेळीच लक्ष दिले असते तर आज दोघांचा जीव वाचला असता असेही त्या म्हणाल्या आहेत. या लाडावलेल्या बिल्डर बाळाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल आता लक्ष द्यायचे म्हणत आहेत. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

काय घातल्या अटी....अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल कोर्टात आले होते. त्यांनी लाडक्या नातवाला वाईट संगतीपासून लांब ठेवण्याची हमी कोर्टाला दिली. तसेच अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल असेही ते कोर्टाला म्हणाले. याचबरोबर कोर्टाने अल्पवयीन आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील असे म्हटले आहे. पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, पळून जाणार नाही, अशी हमी त्याच्या वकिलांनी दिली आहे. भविष्यात अपघात झाल्यास किंवा दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल, निबंध लिहावा लागेल व पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन करावे लागेल अशा अटी या आरोपी बाळाला घालण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातAccidentअपघात