शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पवार-ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट; तो फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:13 IST

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे.

NCP Supriya Sule ( Marathi News ) : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली निकाल जाहीर केला. "पक्षातील बहुमताच्या आधारावर शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. शिवसेनेची २०१८ची घटनाच ग्राह्य धरता येत नाही. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद अस्तित्वात नाही. घटनेनुसार अधिकार कार्यकारिणीला असून, पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना पटावरून हटवण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही," असा महत्त्वपूर्ण निकाल राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. त्यामुळे शिवसेनेवरील एकनाथ शिंदे यांचं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या निकालावरून हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये सुळे यांनी म्हटलंय की, "मराठी मुलुखात सार्वजनिक जीवनाची सुरुवात करून देशभरात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे हे दोघे साठीच्या दशकातील नेते. आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्या गौरवास्पद कामगिरीचा. त्यांनी उभे केलेले कार्य मोडून काढण्यासाठी त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट-कारस्थानं सुरू आहेत," असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.

सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असताना सुळे यांनी आम्ही लढणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. "पवार-ठाकरेंचे निष्ठावंत सहकारी त्यांनी केलेल्या कार्याला धक्का लावू देणार नाहीत. मराठी स्वाभिमानाचा झेंडा आकाशात फडकत राहील. यासाठी प्रयत्नांची शर्थ करू  व त्यांना अभिमान वाटेल असे कार्य आपण उभे करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमधून भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केल्याने सुळे यांच्या टीकेला या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार