Video: सुप्रिया सुळे यांच्या साडीला दीपप्रज्वलन करताना आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:38 IST2023-01-16T10:37:45+5:302023-01-16T10:38:43+5:30
हार घालत असताना त्यांच्या साडीचा पदर समईजवळ गेल्याने साडीने लगेच पेट घेतला.

Video: सुप्रिया सुळे यांच्या साडीला दीपप्रज्वलन करताना आग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलन करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवाने यामध्ये त्यांना कोणतीही इजा झाली नाही. हिंजवडीमध्ये कराटे क्लासेसचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्या क्लासचे उद्घाटन करत असताना सुळे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी मूर्तीसमोर समई पेटवलेली होती.
आपण सुरक्षित : सुप्रिया सुळे
आपण सुरक्षित असून, कुणीही काळजी करू नये, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले आहे.