शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या मुलभूत स्वातंत्र्यांवर गदा आणणाऱ्या सरकारला न्यायालयाची चपराक - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 21:22 IST

आधार कार्डबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय जनतेच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणारा आहे. आधार कार्ड मोबाईल क्रमांक व बँक खात्याला जोडण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबई : आधार कार्डबाबत आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्याच्या प्रयत्न करणा-या केंद्र सरकारला सणसणीत चपराक असून, काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, आधार कार्डबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय जनतेच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणारा आहे. आधार कार्ड मोबाईल क्रमांक व बँक खात्याला जोडण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आधार कायद्यात केंद्र सरकारने दुरुस्ती करून लोकांवर नजर ठेवण्यासाठी हेरगिरीच्या उद्देशाने ठेवलेले कलम 57 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे आता कोणतीही खासगी कंपनी व संस्था आधार मागू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने विद्यमान केंद्र सरकारचे आधारबाबतचे ९० टक्के दावे फेटाळले आहेत. हा मोदी सरकारला मोठा झटका आहे. युपीए सरकारने योग्य रितीने तयार केलेले आधार विधेयक मोदी सरकारने संपुष्टात आणले होते. मोदी सरकारने त्यात अनेक बदल करून जनतेच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. पण सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. हा तत्कालीन युपीए सरकारने बनवलेल्या आधार विधेयकाचा विजय असून, एनडीएच्या हुकूमशाही मानसिकतेचा पराभव आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.

आज पदोन्नतीतील आरक्षणाबाबतही सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काँग्रेस पक्ष या निर्णयाचे स्वागत करित आहे. सुप्रिम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे पदोन्नतीत आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळाला आहे. यासोबतच राज्यांनी विविध वर्गांचे मागासलेपण दूर करण्यासाठी सार्वजनिक सेवेत त्या वर्गाचं प्रतिनिधीत्व पुरेसं नसल्याचं रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं. पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी मागासलेपणाचा अभ्यास करणं ही सर्वात मोठी समस्या होती. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे या सर्वेक्षणाची गरज नसल्याचं स्पष्ट करण्यात आल्याने सरकारांना पदोन्नतीत आरक्षण लागू करणं सोपं जाणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAdhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय