शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला 'सर्वोच्च' धक्का! १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यास न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 13:38 IST

ठाकरे सरकारला मोठा दिलासा; भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन कायम

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं. त्याविरोधात भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी आज सुनावणी झाली. मात्र न्यायालयानं आमदारांचं निलंबन रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे, तर महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळी अधिवेशनात गदारोळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन झालं. त्यामुळे सदनातील भाजपचं संख्याबळ कमी झालं. या प्रकरणी भाजपनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र न्यायालयानं भाजपच्या आमदारांना जोरदार झटका दिला. निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला. 

विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान सांगितलं. १२ आमदारांनी अध्यक्षांकडे विनंती करावी, अशी सूचना न्यायालयानं केली. निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यानं येत्या अधिवेशनात १२ आमदारांना उपस्थित राहता येणार नाही. या प्रकरणी ११ जानेवारीला पुढील सुनावणी होईल.

पावसाळी अधिवेशनात काय घडलं होतं?विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या १२ पैकी चौघे माजी कॅबिनेटमंत्री राहिले आहेत.कोण कोण निलंबित?- डॉ. संजय कुटे - जळगाव जामोद, जि. बुलडाणा- अ‍ॅड. आशिष शेलार - वांद्रे पश्चिम, मुंबई- अभिमन्यू पवार - औसा, जि. लातूर- गिरीश महाजन -जामनेर, जि. जळगाव- अतुल भातखळकर -कांदिवली पूर्व, मुंबई- पराग अळवणी - विलेपार्ले, मुंबई- हरीश पिंपळे - मूर्तिजापूर, जि. अकोला- राम सातपुते - माळशिरस, जि. सोलापूर- जयकुमार रावल - शिंदखेडा, जि. धुळे- योगेश सागर - चारकोप, मुंबई- नारायण कुचे - बदनापूर, जि. जालना- कीर्तिकुमार भांगडिया - चिमूर, जि. चंद्रपूर

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपा