शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालय १५ जुलैला अंतरिम आदेश देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 2:22 PM

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल शक्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचं मत

मराठा आरक्षणावरीलसर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; १५ जुलैला अंतरिम आदेशासाठी सुनावणीनवी दिल्ली: मराठा आरक्षण प्रकरणात १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय अंतरिम आदेश देणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर सुनावणी पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, असं म्हणत न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देण्यात येईल, अशी भूमिका न्यायालयानं मांडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकाल देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरु झाल्यानंतरच यावर निकाल येणार आहे. न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी आपल्या बाजू ठोसपणे मांडल्या. मात्र, यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकूनच निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणावर खुल्या न्यायालयात सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात केली. राज्य सरकारचे अधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी मराठा आरक्षणाचे सर्व मुद्दे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मांडता येत नसल्याचा युक्तिवाद केला.मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका असून मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं मराठा आरक्षणास मान्यता देणाऱ्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याकडे कल दर्शवला.राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केलं. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.१ डिसेंबर २०१८ पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झालं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय