शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाला पाठिंबा, आमच्या ताटातलं घेऊ नका; सावरगावच्या मेळाव्यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:56 IST

आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात करीत पुन्हा एकदा  ओबीसी आरक्षणावर लक्ष वेधले.

पाटोदा । कुसळंब : मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना, प्रत्येक अठरापगड जातीसाठी मी लढणार आहे. त्यांनी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, उलट समर्थन दिले. त्यामुळे आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे भावनिक आवाहन भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात करीत पुन्हा एकदा  ओबीसी आरक्षणावर लक्ष वेधले.

पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे गुरुवारी दसरा मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे या बोलत होत्या. यावेळी आमदार धनंजय मुंडे, प्रा. लक्ष्मण हाके, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार नमिता मुदंडा, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते. 

नका खोटे धंदे करू, नका गुंड पाळू, दोन घास  कमी खा; पण स्वाभिमानाने राहा.  कुणाचे तुकडे उचलू नका, कुणाचे पैसे घेऊ नका, खोटे काम, खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.  रक्तबीजासारखे राक्षस संपविण्याची शक्ती आम्हाला दुर्गा देवीने द्यावी, असे पंकजा मुंडे यांनी देवीला साकडे घालत  जातीय राजकारणावर प्रहार केला. 

या ताटातले काढून त्या ताटात जाऊ देणे योग्य नाही मराठा समाजाला आरक्षण दिले, याचा आम्हाला आनंद आहे; पण काही जणांना आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आहे. हे कुणाला फसवत आहेत? स्वतःला खुर्ची मिळावी, यासाठी सुरू आहे. सरकारने सर्व काही केले, आता या ताटातले काढून त्या ताटात जाऊ देणे हे योग्य नाही, असे आमदार  धनंजय मुंडे म्हणाले. 

म्हणे ‘कराड आमचे दैवत’ गर्दीत झळकले पोस्टर्स सावरगाव  येथील दसरा मेळाव्यात  ‘वी सपोर्ट कराड’ आणि ‘कराड आमचं दैवत’ अशा आशयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळाले.  व्यासपीठावरून निवेदकाने विशेष सूचना करीत फक्त संत भगवान बाबा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांचे फोटो दाखवा, इतर कोणाचेही पोस्टर्स झळकवू नका, चुकीचा मेसेज जाईल, असे बजावले.

English
हिंदी सारांश
Web Title : Support Maratha quota, don't take our share: Pankaja Munde

Web Summary : Pankaja Munde supports Maratha reservation, urging no encroachment on OBC quotas at Savargaon's Dussehra rally. Dhananjay Munde echoed concerns about diverting OBC resources. Posters supporting 'Karad' were displayed, later discouraged.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणPankaja Mundeपंकजा मुंडे