उपराजधानीचा मेकओव्हर

By Admin | Updated: August 18, 2014 00:30 IST2014-08-18T00:30:54+5:302014-08-18T00:30:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ आॅगस्टला शहरातील १३ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.

Superman makeover | उपराजधानीचा मेकओव्हर

उपराजधानीचा मेकओव्हर

पंतप्रधान करणार भूमिपूजन : १३ हजार कोटींची विकास कामे
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २१ आॅगस्टला शहरातील १३ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. माजी आमदार मोहन मते यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त महाल येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी प्रथमच नागपुरात येत आहे. कस्तूरचंद पार्क वर आयोजित कार्यक्र मात मेट्रो रेल्वेसह विविध विकास कामांचे भूमिपूजन करतील. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय उर्जामंत्री पीयूष गोयल आदी उपस्थित राहणार आहे.
मौदा येथे नॅशनल थर्मल पॉवर स्टेशनतर्फे (एनटीपीसी)आयोजित कार्यक्र माला जिल्ह्यातील तर कस्तूरचंद पार्कवरील कार्यक्रमाला शहरातील पक्ष कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. नागपूर शहरातील हजारो कोटींच्या विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. यात मेट्रो रेल्वेसह पारडी , लिबर्टी, मनीषनगर, आॅटोमोटिव्ह चौक आदी ठिकाणच्या मार्गावरील उड्डाण पूल, तसेच खापरी पुलाच्या चौपदरीकरणाचे मोदी यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
नागपूर हे देशातील सुंदर शहर व्हावे, अशी इच्छा आहे. या दृष्टीने विकास योजना राबविल्या जाणार आहे. भविष्यात मिहान प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरसह विदर्भातील बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहरातील प्रकल्प रखडले आहे. परंतु आता केंद्र शासनाच्या निधीतून प्रकल्प मार्गी लागतील, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
व्यासपीठावर भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मनपातील सत्तपक्षनेते प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे सभापती सुधाकर कोहळे, नासुप्रचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, आरोग्य समितीचे सभापती रमेश शिंगारे, माजी आमदार मोहन मते आदी उपस्थित होते.

Web Title: Superman makeover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.