सनी लिओनीमुळे लातूरात आयोजक-पत्रकारांमध्ये झाली धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 17:27 IST2017-05-31T17:27:24+5:302017-05-31T17:27:24+5:30

बेबी डॉल सनी लिओनीने आज लातूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात...

Sunny Leone rumored to be involved in organizers and journalists | सनी लिओनीमुळे लातूरात आयोजक-पत्रकारांमध्ये झाली धक्काबुक्की

सनी लिओनीमुळे लातूरात आयोजक-पत्रकारांमध्ये झाली धक्काबुक्की

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 31 - बेबी डॉल सनी लिओनीच्या सेक्सी अदा आणि नखऱ्यांवर सारेच फिदा होतात. तिचा बोल्ड लुक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो. अभिनेत्री सनी लिओनीने आज लातूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. निमित्त होतं एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनाचं. खरं तर हा कार्यक्रम संध्याकाळी होणार होता, पण अचानकपणे तो दुपारीच उरकण्यात आला. आता सनी येणार म्हटल्यावर तिथे पत्रकार आणि तिचे चाहते पोहोचणार नाही, असं कसं होईल... सनीच्या चाहत्यांसोबतच पत्रकारसुद्धा तिथे उपस्थित होते. यावेळी सनीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने सनीला आपण बोल्ड चित्रपटात काम करता याबाबत आपणास वाईट वाटते का? असा प्रश्न विचारला. त्यावर आयोजकांनी प्रश्नावर आक्षेप घेत बाचाबाची केली. ही बाचाबाची पुढे धक्का-बुक्कीपर्यंत पोहोचली.
आयोजक आणि पत्रकारांमध्ये धक्काबुक्की सुरु असताना सनी लिओनीने मध्यस्थी करत, इट्स ओके म्हणत आयोजकांना आवरले. इतकेच नाही तर पुढे प्रकरण चिघळणार नाही, याची काळजीही घेतली. या सर्व प्रकाराननंतर आयोजकांनी सारवासारव करत त्याच ठिकाणी माफीनामाही सादर केला.

Web Title: Sunny Leone rumored to be involved in organizers and journalists