शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

रायगडमध्ये तटकरे, कोल्हापुरात महाडिक; लोकसभेसाठी राष्ट्रवादीचं ठरलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:47 IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे, महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. तर कोल्हापुरमधून धनंजय महाडिक मैदानात असतील. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे लढणार आहे. रायगड आणि कोल्हापूर या दोन जागांवरील उमेदवार राष्ट्रवादीनं निश्चित केले आहेत. रायगड मतदारसंघातून सुनील तटकरेंचं नाव निश्चित झालं आहे. तटकरे यांच्या नावाला भास्कर जाधव यांनी विरोध केला होता. त्यामुळे रायगडमधून कोणाला उमेदवारी मिळणार, याबद्दल उत्सुकता होती. मात्र शरद पवारांनी निष्ठावंत तटकरेंच्या पारड्यात वजन टाकलं. आता निवडणुकीत भास्कर जाधव यांची भूमिका नेमकी काय असणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. धनंजय महाडिक हे सध्या लोकसभेत कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे महाडिक या जागेसाठी आग्रही होते. मात्र त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा विरोध होता. मात्र शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचे केवळ चार उमेदवार निवडून आले होते.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raigadरायगडkolhapurकोल्हापूर