शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

नोव्हेंबरअखेरपासूनच ऐकू येणार विवाहेच्छूंचा अंगणात सनईचे सूर!

By admin | Published: November 20, 2014 10:01 PM

यंदा कर्तव्य उशिराच : पुढील वर्षात नियोजित वधू-वरांसाठी मोठ्या तारखा

सातारा : लग्न ठरवून बसलेले अनेक नियोजित वधू-वर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. मात्र, तुळशीच्या लग्नाला पंधरा दिवस होऊ गेले तरी लग्नाचा लाडू काही खायला मिळाला नाही. यंदा तारखाच कमी असल्याने नोव्हेंबरअखेरपासूनच लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार आहे.आपणाकडे विनोदाने म्हटले जाते की, ‘शादी का लड्डू जो खाए ओ पछताए और जो ना खाए ओ भी पछताए,’ हे अगदी खरं आहे. अनेकांची लग्नं सहा-सात महिन्यांपूर्वीच ठरली आहेत. शक्यता दरवर्षी दिवाळी झाली की लग्नाच्या तिथी सुरू होतात; पण यंदा याला काहीसा उशीर झाला आहे. लग्नाच्या तिथी नोव्हेंबरअखेर पासूनच सुरू होत आहेत. त्यामुळे नियोजित वधू-वरांसाठी कधी हा काळ जातोय, अशी अवस्था झाली आहे.नियोजित वधू-वरांसाठी हा काळ प्रतीक्षेचा असला तरी लग्नघरातील वडीलधाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. कारण, त्यांना लग्नाची तयारी करण्यासाठी मोठा कालावधी मिळाला आहे. लग्न पत्रिकाही छापून आल्या आहेत. त्या मित्रमंडळी, पै-पाहुण्यांना देण्यात ते दंग आहेत. तुळशीच्या लग्नानंतर लग्न काढल्यास शाळा-महाविद्यालयांना सुटी असते. त्यामुळे मोठ्या संख्येने पाहुणे येत असतात; मात्र शाळा सुरू झाल्यामुले पाहुण्यांच्या येण्यावर मर्यादा येणार आहेत. यंदा २६ नोव्हेंबरपासून लग्नाच्या तिथी सुरू होत आहेत. नोव्हेंबरमध्ये केवळ दोन तिथी असून, डिसेंबरमध्ये चक्क बारा तारखा आहेत. यामध्ये १, ३, ६, ७, १२, १५, १६, १७, १८, २४, २८, ३० या तारखा लग्नासाठी शुभ मानल्या जात आहेत. २०१५ या वर्षात १२ जूनपर्यंत ५९ लग्नतिथी आहेत. यामध्ये जानेवारीत २४, २५, २६, २९, फेबु्रवारी ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १५, २१, २२, २३, २७. मार्च ४, ७, ९, १०, १२, १७. एप्रिलमध्ये २१, २७, २८, ३०. मे २, ५, ६, ७, ८, ९, ११, १४, १५, २७, २८, ३०. जून २, ४, ६, ७, ११ व १२. (प्रतिनिधी)माझे लग्न ठरून सात महिने झाले आहेत. इतके दिवस काही वाटले नाही, मोबाईलवरून आम्ही नेहमी बोलत असतो; पण कधी एक तारीख येईल, असे झाले आहे. आम्ही एक-एक दिवस मोजत आहोत.- शीतल गारे, नियोजित वधूलग्न म्हटले की, रुखवत हा बनवायलाच हवा. लग्नात मुलीकडून काय रुखवत मिळाला आहे, हे पाहण्यासाठी गृहिणींची चढाओढ असते. काही ठिकाणी चक्क विविध नातेवाईकांच्या लग्नात दिलेल्या रुखवताशी तुलना केली जाते. योगायोगाने यंदा लग्नसराईला उशिर झाला आहे. त्यामुळे वधूपक्षाला चांगलात चांगला रुखवत बनविण्यास जादा वेळ मिळाला आहे.वाजंत्री, घोडेवाल्यांचेही नियोजनतारखा उशिरा असल्या तरी वाजंत्रीवाल्यांची तयारी जोरात सुरू आहे. नवनवीन गाणे वाजविण्याची ते रात्रंदिवस तयारी करत आहेत. तर घोडेवालेही घोड्यांना त्यावर नृत्य शिकविणे, सराव करून घेत आहेत. उशिरा लग्न तिथी असल्याने एकाच तारखेला जास्त लग्न असल्याने या मंडळींनी दोन, तीन ठिकाणाच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत.