मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांनी शपथ घेताच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आणि समर्थकांनी "अजित पवार अमर रहे" च्या घोषणा दिल्या.
दरम्यान, सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाती घ्यावीत अशी मागणी नेत्यांकडून होत होती. त्यात सकाळी देवगिरी निवासस्थानी येत सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. त्यानंतर हे सगळे नेते बैठकीतून बाहेर पडले. मग सुनेत्रा पवारांसह सगळेच नेते विधान भवनात पोहचले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. शनिवारी विधान भवनात झालेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत एकमताने हा ठराव मान्य करण्यात आला. अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यात विधिमंडळ गटनेतेपद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने पक्षातील नेत्यांनी हालचाली सुरू करत अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे रिक्त झालेल्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी या घडामोडी घडल्या आहेत.
Web Summary : Following Ajit Pawar's death, his wife, Sunetra Pawar, was sworn in as Deputy Chief Minister. NCP MLAs chanted "Ajit Pawar Amar Rahe." She was also appointed leader of the NCP legislative group after leaders urged her to take charge of the party.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद उनकी पत्नी सुनेत्रा पवार ने उपमुख्यमंत्री पद की शपथ ली। राकांपा विधायकों ने "अजित पवार अमर रहे" के नारे लगाए। नेताओं द्वारा पार्टी का प्रभार संभालने का आग्रह करने के बाद उन्हें राकांपा विधायी दल का नेता भी नियुक्त किया गया।