शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

"सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेला नाही, तसा विषयही झाला नाही; कारण...", सुनील तटकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:55 IST

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एका दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होत्या. सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आटोपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

Sunil Tatkare Suentra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. अजित पवारांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याची केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात असून, अशातच त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचेही चर्चा सुरू झाली. पण, ही चर्चा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावली.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचे सभापती राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे. त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे का? असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला होता. 

सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिला की नाही? 

सुनील तटकरे म्हणाले, "सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा देण्याचा विषयही त्याठिकाणी झाला नाही. कारण उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असल्यामुळे त्यांची भेट घेणे, हा आजच्या दौऱ्यातील भाग होता."

"कुठल्याही व्यक्तीला राज्याचा किंवा देशाचा मंत्री होत असताना सहा महिने त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा वेळ असतो. अशा वेळी इतर सभागृहाचे सदस्यत्व त्याच्याकडे असेल, तर ते कायद्याने ठेवता येते. उदाहरण बघायचं तर अजित पवार १९९१ मध्ये लोकसभेचे सदस्य झाले. त्यावेळी शरद पवार हे देशाचे संरक्षण मंत्री झाले", असे कारण सुनील तटकरे यांनी सांगितले. 

सुनील तटकरे पुढे म्हणाले की, "अजित पवार त्यावेळी राज्यामध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले होते. त्यावेळी अजित पवार लोकसभेचे सदस्य होते. असे अनेक उदाहरणे आहेत. त्या कुटुंबाशी निगडित असल्यामुळे अजित पवारांचे उदाहरण दिले."

राष्ट्रवादी (शरद पवार) एनडीएमध्ये येत असेल तर विलिनीकरण करणार का?

दिल्लीत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, "जर तर वरती मी कसं बोलणार? २०१९ किंवा २०१४ पासून भाजपासोबत सरकारमध्ये असावे, अशी अजित पवारांची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांमध्ये अजित पवारांनी स्पष्टपणे ती भूमिका मांडली होती. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधीही झाला होता."

"२०२३ मध्ये वारंवार पक्षात चर्चा होऊनही भाजपासोबत जाण्याचा निर्णय होत नव्हता. त्यावेळी आम्ही एनडीएमध्ये सामील झालो. तो पुढच्या काळातही आम्ही एनडीएमध्ये राहणार आहोत", असे सांगत तटकरेंनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलणंच टाळलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar did not resign; Sunil Tatkare clarifies reason.

Web Summary : Sunetra Pawar's Delhi visit sparked resignation rumors, denied by Sunil Tatkare. Her meeting with the Vice President, who heads the Rajya Sabha, was part of the visit. Tatkare cited precedents where ministers held concurrent legislative memberships.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण