बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांना शपथ दिली जाणार आहे. बारामती येथील 'सहयोग सोसायटी' निवासस्थानावरून सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव जय पवार आज रात्री मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
उद्याचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दुपारी २:०० वाजता मुंबईतील विधानभवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून अधिकृत निवड केली जाईल. यानंतर सायंकाळी पाच वाजता राजभवनावर राज्यपाल सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा या मंत्रालयांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर अजितदादांकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. "राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही राहू," असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
Web Summary : Sunetra Pawar departs Baramati for Mumbai, set to be sworn in as Deputy Chief Minister. She'll be elected legislative leader, then take oath. She may get Excise and Sports portfolios. Ajit Pawar's finance role likely with Fadnavis.
Web Summary : सुनेत्रा पवार बारामती से मुंबई के लिए रवाना, उपमुख्यमंत्री पद की शपथ लेंगी। वह विधानमंडल दल की नेता चुनी जाएंगी, फिर शपथ लेंगी। उन्हें आबकारी और खेल विभाग मिल सकते हैं। अजित पवार का वित्त विभाग फडणवीस के पास रहने की संभावना है।