संडे ‘गटारी’फुल्ल!
By Admin | Updated: July 21, 2014 03:41 IST2014-07-21T03:41:27+5:302014-07-21T03:41:27+5:30
गरमगरम मटणाचा रस्सा, कोंबडीवडे, मसालेदार पापलेट, तळलेली सुरमई अशा चमचमीत मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेत मुंबईकरांनी बेहोश होत आजच्या रविवारी गटारी साजरी केली.

संडे ‘गटारी’फुल्ल!
मुंबई : गरमगरम मटणाचा रस्सा, कोंबडीवडे, मसालेदार पापलेट, तळलेली सुरमई अशा चमचमीत मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेत मुंबईकरांनी बेहोश होत आजच्या रविवारी गटारी साजरी केली.
विशेषत: शनिवार आणि रविवारचा फायदा घेत कालपासूनच मुंबईबाहेरील पिकनिक स्पॉटवर दाखल झालेल्या मुंबईकरांनी गटारी जल्लोषात साजरी केली. २७ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत असून, या महिन्यात मांसाहार वर्ज्य असल्याने आषाढी अमावस्येला आणि त्यापूर्वीच्या शेवटच्या रविवारी, बुधवारी आणि गुरुवारी गटारी साजरी केली जाते. २७ जुलैला रविवार असल्याने मुंबईकरांनी आजच्याच रविवारी मांसाहारावर ताव मारला.
विशेषत: महिनाभर तरी मासांहार आणि मद्य वर्ज्य करावे लागणार असल्याने श्रावण पाळणाऱ्या मुंबईकरांनी १५ दिवसांपासूनच गटारीचे प्लॅनिंग केले होते. सोशल नेटवर्क साइट्सह व्हॉट्सअॅपवरून चक्क गटारीच्या शुभेच्छा देणारे एसएमएस कित्येक दिवसांपासून फिरत होते. शिवाय आषाढ अमावस्येच्या पूर्वीच्या अखेरच्या रविवारी मटणासह मच्छीमार्केटमध्ये गर्दी केली होती़ दुसरीकडे वसईतील तुंगारेश्वर, आषाणे धबधबा, भुशी डॅम आणि लोणावळ्यासह उर्वरित पिकनिक स्पॉटकडेही मुंबईकरांनी गटारी साजरी करण्यासाठी धाव घेतली होती.
शहर आणि उपनगरांतील मटणाच्या दुकानांवर मटणाच्या खरेदीसाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती़ तर दुसरीकडे तळीरामांचा गटारीचा उत्साह ओसांडून वाहत असल्याने येथील चित्र मात्र बेहोश असेच काहीसे होते. (प्रतिनिधी)