सुमित्र महाजन नव्या लोकसभाध्यक्ष ?
By Admin | Updated: June 5, 2014 00:26 IST2014-06-05T00:26:30+5:302014-06-05T00:26:30+5:30
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि अत्यंत अनुभवी खासदारांपैकी एक असलेल्या सुमित्र महाजन 16 व्या लोकसभेच्या नव्या अध्यक्ष होणो जवळजवळ निश्चित झाल्याचे मानले जात आह़े

सुमित्र महाजन नव्या लोकसभाध्यक्ष ?
>जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि अत्यंत अनुभवी खासदारांपैकी एक असलेल्या सुमित्र महाजन 16 व्या लोकसभेच्या नव्या अध्यक्ष होणो जवळजवळ निश्चित झाल्याचे मानले जात आह़े
पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्वत: सुमित्र महाजन यांना या नव्या जबाबदारीचे संकेत दिल्याचे सूत्रंकडून समजते. लोकसभा अध्यक्षांची शुक्रवारी निवडणूक होणार आह़े 71 वर्षीय सुमित्र महाजन 1989 पासून आत्तार्पयत एकही लोकसभा निवडणूक हरलेल्या नाहीत़ लोकसभा निवडणुकीत त्या इंदूरमधून आठव्यांदा निवडून आल्या आहेत.
थंबी दुराई उपाध्यक्ष
राज्यसभेत अल्पमतात असलेल्या भाजपाप्रणित सरकारने उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याऐवजी अण्णा द्रमुकचे थंबी दुराई यांना देण्याची तयारी केली आहे. त्याची पाश्र्वभूमी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या भेटीत तयार झाल्याचे बोलले जाते.