पती मतदानास गेला म्हणून मुलींना मारून महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: November 25, 2015 13:37 IST2015-11-25T13:37:32+5:302015-11-25T13:37:53+5:30

आपल्या विरोधाला न जुमानता पती मतदानासाठी गुजरातला गेल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलींना मारून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली.

Suicide of a woman by killing girls and leaving her to go to voting | पती मतदानास गेला म्हणून मुलींना मारून महिलेची आत्महत्या

पती मतदानास गेला म्हणून मुलींना मारून महिलेची आत्महत्या

>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. २५ - आपल्या विरोधाला न जुमानता पती मतदानासाठी गुजरातला गेल्याच्या रागातून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलींना मारून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडली आहे. 
कौपरखेरणेतील सेक्टर १९ येथे हरीप्रिया इमारतीत राहणारे हिरजी वाविया मतदानासाठी गुजरातला गेले होते, मात्र त्यांची पत्नी जागृती यांनी त्यांना गुजरातला जाण्यास विरोध केला होता. पत्नीच्या विरोधाला न जुमानता हिरजी गावी गेले खरे, पण त्यापायी त्यांना आपली पत्नी व दोन चिमुकल्या मुलींना गमवावे लागले. हिरजी गुजरातला गेल्यानंतर संतापलेल्या जागृती यांनी घृविया (वय ५) आणि वंशिका (वय अवघे दीड वर्ष) या पोटच्या पोरींना गळफास दिला व स्वत:ही आत्महत्या केली. मात्र हे कृत्य करण्यापूर्वी त्यांनी आपल्या भाऊ दया गोठी यांना फोन करून याची माहिती दिली. बहिणीला वाचवण्यासाठी दया यांनी तातडीने धाव घेतली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याप्रकरणी पोलिस आणखी तपास करत आहेत.

Web Title: Suicide of a woman by killing girls and leaving her to go to voting