मुंबई : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे गेल्या राज्यभरात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. यात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रत्येक एका शेतकऱ्याचा समावेश आहे. कुरूंदा (जि. हिंगोली) येथील शेतकरी नागोराव गणपत दळवी (५०) यांनी शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यांच्यावर हैदराबाद बँकेचे ८० हजार रुपयांचे कर्ज होते. नांदेड येथे उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.तसेच म्हातोडी (जि. अकोला) येथील घुसरवाडीतील शेतकरी लक्ष्मण भिकाजी घावट (६८) यांनी बुधवारी विषारी औषध प्राशन केले होते. शुक्रवारी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>बॅँकेचे १ लाख रुपयांचे कर्ज धुळे तालुक्यातील नवे भदाणे येथील शेतकरी नाना काळू श्रीराम उर्फ ठेलारी(३६) याने गुरुवारी रात्री राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर सेंट्रल बॅँकेचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: April 8, 2017 04:53 IST