साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसह मातेची पैनगंगेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:05 IST2017-08-28T06:05:03+5:302017-08-28T06:05:21+5:30

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला पैनगंगा नदीपात्रात फेकून मातेनेही नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी येथे रविवारी दुपारी घडली.

Suicide of mother's Penganga with a three-and-a-half-year-old child | साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसह मातेची पैनगंगेत आत्महत्या

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसह मातेची पैनगंगेत आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी (यवतमाळ) : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला पैनगंगा नदीपात्रात फेकून मातेनेही नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी येथे रविवारी दुपारी घडली. यापैकी मातेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, तर चिमुकलीचा शोध सुरू होता.
सपना अमरेश गोंटीमुकुलवार (४२, रा. धोबी कॉलनी आदिलाबाद, तेलंगणा) असे मृत मातेचे, तर आदित्या असे बेपत्ता चिमुकलीचे नाव आहे. आदिलाबादहून सपना मुलीसह एका आॅटोरिक्षाने पिंपळखुटी येथील पैनगंगेच्या पुलावर आली. भाड्यासाठीही पैसे नसल्याने, तिने कानातील सोन्याचे दागिने काढून रिक्षाचालकाला दिले. रिक्षाचालक निघून गेल्यानंतर, सपनाने आदित्याला पुलावरून पैनगंगेच्या पात्रात फेकले. पाण्यात मोठा आवाज झाल्याने काही जणांनी पुलाकडे धाव घेतली आणि सपनाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने लोकांच्या समक्ष नदीपात्रात उडी घेतली.

Web Title: Suicide of mother's Penganga with a three-and-a-half-year-old child