सुहास वारके नागपुरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त
By Admin | Updated: June 20, 2016 20:21 IST2016-06-20T19:59:43+5:302016-06-20T20:21:20+5:30
केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून नुकतेच परतलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास मधुकर वारके यांची नागपुरात बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश गृहविभागाने आज जारी केला.

सुहास वारके नागपुरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून नुकतेच परतलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास मधुकर वारके यांची नागपुरात बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश गृहविभागाने आज जारी केला.
एमबीबीएस, एलएलबी असे उच्चशिक्षीत असलेले सुहास वारके २००० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना २०१५ मध्ये राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. ते आतापावेतो केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. २३ मे २०१६ ला प्रतिनियुक्तीवरून राज्य पोलीस दलात परतल्यापासून ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. गृहविभागातर्फे आज नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला.
विशेष म्हणजे, सध्या नागपुरातील तीनही अतिरिक्त पोलीस आयुक्तांची पदे रिक्त आहे. वर्षभरापूर्वी येथून दीपक पांडे आणि श्रीकांत तरवडे या दोन अधिका-यांची बदली झाली. त्यातील पांडे यांना वर्षभरापूर्वी कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रभागाचा पदभार तरवडे यांच्याकडे आला. तर, गुन्हेशाखेच्या अतिरिक्त आयुक्तांची जबाबदारी रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सोपविण्यात आली. तरवडे यांची महिन्याभरापूर्वी बदली झाली. तेव्हापासून दोन्ही पदे रिक्तच आहेत. मध्यंतरी दैठणकर आणि त्यानंतर रविंद्र शिसवे यांची येथे बदली झाली. मात्र, दोन पैकी एकाही अधिका-याने नागपुरात येण्यात स्वारस्य दाखवले नाही. आता वारके यांची बदली झाल्याने ते नागपुरात कधी रुजू होतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.