शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देशातील साखर उत्पादन ३०७ लाख टनांवर राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:57 IST

गेल्या वर्षी पेक्षा तब्बल १३ लाख टनांनी साखर उत्पादनात घट होणार आहे. 

ठळक मुद्देगेल्या वर्षी देशात विक्रमी ३२० लाख टन साखर उत्पादन , महाराष्ट्रात हुमणी रोगाचा झालेला प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता देशातील साखरेची वार्षिक मागणी २४५ लाख टनांच्या आसपास

पुणे : उत्तर प्रदेशात साखरेच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता, साखरेच्या उपपदार्थांवर अनेक कारखान्यांनी लक्ष केंद्रीय केल्याने यंदा देशातील साखरेचे उत्पादन ३०७ लाख टनापर्यंत खाली येईल, असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी पेक्षा तब्बल १३ लाख टनांनी साखर उत्पादनात घट होणार आहे. गेल्या वर्षी देशात विक्रमी ३२० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा देखील त्याच आकड्याच्या आसपास उत्पादनाचा अंदाज होता. पावसाने दिलेली ओढ, महाराष्ट्रात हुमणी रोगाचा झालेला प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत होती. नुकताच ३१० लाख टनांचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, त्यापेक्षाही कमी उत्पादन होईल असे आता सांगण्यात येत आहे. देशातील साखरेची वार्षिक मागणी २४५ लाख टनांच्या आसपास आहे. त्यामुळे हे उत्पादन देखील मागणीच्या तुलनेत अधिक आहे. दरम्यान, राज्यात २९ मार्च अखेरीस ९३३.२६ लाख टन ऊस गाळपातून १०४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, १९५ पैकी १३२ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के इतका आहे. गेल्यावर्षी ८७२.११ लाख टन ऊस गाळपातून ९६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, सरासरी साखर उतारा ११.११ टक्के होता. उत्तर प्रदेशात १५ मार्च अखेरीस ८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात गेल्यावर्षी इतकी वाढ होणार नाही. तसेच, यंदा अनेक कारखान्यांनी बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीली प्राधान्य दिले आहे. अतिरिक्त साखर उत्पादन आटोक्यात राहावे, यासाठी सरकारने देखील उपपदार्थांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे देखील साखर उत्पादनात काहीशी घट होईल, असे साखर क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने