शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशातील साखर उत्पादनात ७१ लाख टनांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 07:00 IST

पुराचा फटका : राज्यातील साखर उत्पादनात ४५ लाख टनांनी होईल घट

ठळक मुद्दे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाजमराठवाडा आणि सोलापूरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले

पुणे : साखर उत्पादक राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती, गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने ऊस क्षेत्रात झालेली घट आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती या कारणांमुळे यंदा देशातील साखर उत्पादनामधे तब्बल ७१.६१ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यातील साखर उत्पादनात मोठी घट असून, महाराष्ट्रात तब्बल ४५ लाख टनांनी घट होईल. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने जुलै महिन्यात देशात २८२ लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. ऑक्टोबर महिन्यात उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे ऊस क्षेत्रात ४८.३१ लाख हेक्टरपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी (२०१८-१९) या हंगामामध्ये ५५.०२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र होते. देशातील एकूण ऊस क्षेत्रापैकी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात सुमारे ४० टक्के क्षेत्र आहे. यंदाच्या मॉन्सूनमध्ये आलेला पूर, अतिवृष्टी आणि गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने घटलेले ऊस क्षेत्र या मुळे या दोन राज्यांत ऊस पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.  मराठवाडा आणि सोलापूरात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने येथील ३० टक्के क्षेत्र घटले आहे. तसेच, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे राज्यात झालेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, २०२८-१९ या हंगामाच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र ११.५४ लाख हेक्टरवरुन ७.७६ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे. त्यामुळे यंदा राज्यातील साखरेचे उत्पादन १०७.२० लाख टनावरुन ६२ लाख टनापर्यंत घटण्याचा अंदाज आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव व विजापूर जिल्ह्यातही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र ५.०२ लाख हेक्टरवरुन ३.९९ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे येथील साखर उत्पादनात गत हंगामातील ४४.३० लाख टनांवरुन ३२ लाख टनापर्यंत घट होईल. या सर्व कारणांमुळे साखरेचे उत्पादन २६८.५ लाख टन होईल. यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीमुळे होणारी घट लक्षात घेतलेली नाही. त्यामुळे साखरेच्या उत्पादनात आणखी साडेआठ लाख टनांची घट संभवते. म्हणजेच यंदा देशातील साखर उत्पादन २६० लाख टनांवर राहील. गेल्या हंगामात देशात ३३१.६१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. हा विचार केल्यास यंदा साखरेच्या उत्पादनात ७१.६१ लाख टनांची घट होईल. उत्तर प्रदेशात गेल्या हंगामात ११८.२१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. चालू हंगामातही १२० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार