बीटपासून साखर उत्पादन; शेतकऱ्यांचा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:31 AM2018-12-03T06:31:30+5:302018-12-03T06:31:42+5:30

बीटपासून साखर उत्पादन करणे शेतक-यांच्या फायद्याचे असल्याने, त्यास प्राधान्य देण्याचा निर्णय रविवारी येथील प्रादेशिक ऊस प्रजनन केंद्रात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या नियामक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

Sugar production from beetle; Farmers will benefit | बीटपासून साखर उत्पादन; शेतकऱ्यांचा होणार फायदा

बीटपासून साखर उत्पादन; शेतकऱ्यांचा होणार फायदा

Next

- विश्वास पाटील

आंबोली (जि. सिंधुदुर्ग) : बीटपासून साखर उत्पादन करणे शेतक-यांच्या फायद्याचे असल्याने, त्यास प्राधान्य देण्याचा निर्णय रविवारी येथील प्रादेशिक ऊस प्रजनन केंद्रात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या नियामक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते.
सध्या जगात बीटच्या बियाण्यांचे ‘सेसव्हेन्डरहॅव’ ही एकच बेल्जिएमची कंपनी उत्पादन करते, तिच्यावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी ‘व्हीएसआय’ने बियाणे उत्पादनांचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी सूचना पवार यांनी केली. साखरेचा हंगाम झाला की, कारखान्याची यंत्रणा बंद राहते. बीटचे उत्पादन करून आणखी एक-दोन महिने कारखाने सुरू ठेवता येतील. बीट हे रब्बी हंगामात येणारे आणि चांगला नफा देणारे पीक असल्याने शेतकºयांनाही त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
>सद्य:स्थिती काय?
महाराष्ट्रात कर्मयोगी अंकुशराव टोपे साखर कारखाना जालना, राजारामबापू साखर कारखाना, साखराळे (ता.वाळवा) व कर्नाटकात रेणुका शुगर्स येथे प्रायोगिक तत्त्वावर बीटपासून साखर उत्पादन होत आहे. राजारामबापू येथील प्रकल्प बारामती अ‍ॅग्रो येथे हलविला असून, तिथे हा प्रयोग करण्यात येणार आहे.

Web Title: Sugar production from beetle; Farmers will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.