शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज वसुलीसाठी साखर कारखाने दिले भाड्याने : राज्य बँकेचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:02 IST

आर्थिक अनियमितता, कमकुवत व्यवस्थापन, सातत्याने झालेला दुष्काळ अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक कारखाने अडचणीत आले आहेत...

ठळक मुद्देराज्यातील ३४ कारखान्यांकडे ५३८ कोटींची थकबाकीया कारखान्यांकडून वर्षाला २० कोटी रुपये बँकेच्या खात्यात जमामार्केटयार्डातील जागा राज्य बँकेच्या ताब्यात न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

पुणे : अडचणीत आलेल्या राज्यातील ३४ साखर कारखान्यांकडे राज्य सहकारी बँकेची तब्बल ५३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या रक्कमेची वसुली करण्यासाठी राज्य बँकेने कारखाने भाडेतत्वावर देण्याचा प्रयोग सुरु केला आहे. असे सहा कारखाने भाड्याने दिले असून, त्यातून वार्षिक २० कोटी रुपयांची रक्कम बँकेच्या खात्यात जमा होत आहे. कारखाने सुरु झाल्याने शेतकऱ्यांना देखील हक्काचा कारखाना उपलब्ध झाला आहे. आर्थिक अनियमितता, कमकुवत व्यवस्थापन, सातत्याने झालेला दुष्काळ अशा विविध कारणांमुळे राज्यातील अनेक कारखाने अडचणीत आले आहेत. या कारखान्यांनी राज्य सहकारी बँकांसह विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. कारखानाच बंद झाल्याने शेकडो कोटी रुपयांची कर्ज खाती अनुत्पादित (एनपीए) झाली आहेत. कारखान्यांची मालमत्ता विकून कर्ज रक्कम वसुल करण्यात अनेक कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे थकीत कर्ज रक्कमेची काही प्रमाणात तरी वसुली व्हावी यासाठी राज्य सहकारी बँकेने १० ते २० वर्षे कराराने कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत माहिती देताना राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख म्हणाले, कर्ज थकबाकीमुळे राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले ३४ साखर कारखाने अवसायानात (लिक्विडेशन) काढले आहेत. त्यांच्याकडे ५३८ कोटी रुपये थकीत आहेत. त्यातील रयत, उदयसिंह गायकवाड, माणगंगा, भाऊसाहेब बिराजदार, शेतकरी सोनी, वसंतदादा, शेतकरी किल्लारी हे कारखाने १० ते २५ वर्षांच्या कराराने भाडेतत्वावर दिले आहेत. या कारखान्यांकडून वर्षाला २० कोटी रुपये बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ----यशवंतच्या जमिनीच्या मूल्यांकनासाठी समिती : विद्याधर अनास्करथेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची काही जागा विकून कारखाना चालू करण्यास उच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती जागेचे मूल्यांकन करणार आहे. या कारखान्यावर इतर बँकांचे देखील कर्ज आहे. त्यांचे कर्ज घेण्याची तयारी राज्य बँकेने दाखविली आहे. संबंधित बँकांशी त्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.   ----मार्केटयार्डातील जागा राज्य बँकेच्या ताब्यात मार्केटयार्ड येथील भू विकास बँकेची ३२ गुंठे जागा लवकरच राज्य सहकारी बँकेकडे हस्तांतरीत होईल. त्यासाठी बँकेने भरलेली २४.७१ कोटी रुपयांची निविदा मंजुर झाली आहे. या जागेवर सहकार प्रशिक्षण संकुल उभारण्यात येईल. साखर कारखान्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उभारणे, तसेच इतर सहकारी संस्थांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी विविध अभ्यासपूर्ण उपक्रम या माध्यमातून राबवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेbankबँक