शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारांनो साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 18:23 IST

साखर आयुक्तांचे आदेश; ९० कारखान्यांकडे अडकले ११७० कोटी, जप्त केलेली साखर विक्री होत नसल्याने राज्य शासनानेच दिली सवलत

ठळक मुद्देराज्यातील १९५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २३ हजार ८९ कोटी रुपये देणे कारखान्यांतील साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या सूचना सोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम घेतलेल्या ३१ पैकी ६ कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांचे पैसे दिले

सोलापूर: आरआरसी कारवाईनुसार जप्त केलेली साखरही लिलावात कोणी घेत नसल्याने आता साखर विक्री करून एफआरपीनुसार शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत शासनानेच साखर कारखान्यांना दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यातील ९० कारखान्यांंकडे ११७० कोटी रुपये इतकी रक्कम अडकली आहे.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी थकविणाºया कारखान्यांना नोटिसा देणे व आरआरसी कारवाईची प्रक्रिया करण्यास जानेवारीपासूनच सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक कारखान्यांनी कारवाई टाळण्यासाठी शेतकºयांचे पैसे दिले आहेत. साखर विक्री करून,इथेनॉलच्या पैशातून किंवा वीज विक्री करून शेतकºयांचे उसाचे पैसे देण्याची सवलत कारखानदारांना दिली होती. त्याप्रमाणे राज्यातील १०५ साखर कारखान्यांनी १५ जूनपर्यंत एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मे महिन्यात सुनावणी घेऊन एफआरपी देण्याची संधी दिल्यानंतरही शेतकºयांचे पैसे देण्यासाठी हयगय करणाºया राज्यातील ७७ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. आरआरसीची कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले आहेत.

सध्या ९० कारखान्यांकडे ११७० कोटी रुपये एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे आहे. आरआरसीच्या कारवाईनुसार साखर जप्त केली तरीही त्याची विक्री होत नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे तुम्हीच साखर विक्री करा व एफआरपी चुकती करा अशा सूचना साखर कारखान्यांना साखर सहसंचालक कार्यालयातून सांगितल्या आहेत. जूनअखेरपर्यंत शेतकºयांचे पैसे द्या असे कारखानदारांना सांगितले जात आहे. आता कारखाना काय करणार?, याकडे लक्ष लागले आहे.

आरआरसीत अडकले ६२४ कोटी- आरआरसी केलेल्या ७७ कारखान्यांकडे ६२४ कोटी रुपये थकबाकीपोटी अडकले. - ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ६० इतकी आहे.- ६० ते ७९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या २२ इतकी आहे. - ५० टक्क्यांपर्यंत एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ८ इतकी आहे. 

४८४ कोटी अडकलेसोलापूर जिल्ह्यातील साखर हंगाम घेतलेल्या ३१ पैकी ६ कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांचे पैसे दिले असून २५ कारखान्यांकडे ४८३ कोटी ६० लाख रुपये इतकी शेतकºयांची रक्कम अडकली आहे. यापैकी सिद्धनाथ कारखान्यांवर ३४ कोटी थकबाकीमुळे सव्वालाख क्विंटल साखर जप्तीची कारवाई केली आहे. 

राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार २३ हजार ८९ कोटी रुपये देणे होते. त्यापैकी २१ हजार ९३२ कोटी रुपये शेतकºयांना दिले असून एफआरपीनुसार ५ टक्के रक्कम देणे आहे. कारखान्यांतील साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे चुकते करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजना