शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बांबूचा औद्योगिक उत्पादनातील वापर वाढवणार - सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 20:09 IST

महाराष्ट्रात बांबू वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्यानंतर आता देशात बांबू ला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आल्याने बांबूची वाहतूक आणि त्यापासूनची उत्पादने या प्रक्रियेला गती येईल.

मुंबई : महाराष्ट्रात बांबू वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्यानंतर आता देशात बांबू ला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आल्याने बांबूची वाहतूक आणि त्यापासूनची उत्पादने या प्रक्रियेला गती येईल. महाराष्ट्राचा हा निर्णय देशपातळीवर स्वीकारल्या गेल्याचा आनंद असल्याचे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी औद्योगिक उत्पादनातील बांबूचा वापर वाढवण्यावर आपण भविष्यात भर देणार असल्याचे स्पष्ट केले.काल (दि.3) वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बांबू बोर्डाची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह बांबू बोर्डाचे सदस्य व वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वन आणि वनेतर जमीनीवर बांबूची लागवड मोठ्याप्रमाणात वाढावी यासाठी प्रयत्न केले जावेत. बांबू हे बहुउपयोगी गवत असून यात स्वंयरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. बांबू पल्पपासून कागदनिर्मिती, वस्त्र निर्मिती,  बांबू चटई, बांबू पासून हस्तकौशल्याच्या वस्तू, बांबूचे घर, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या गृहउपयोगी वस्तू आणि इतर औद्योगिक उत्पादने यात प्रचंड रोजगार संधी दडलेल्या आहेत हे लक्षात घेऊन यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान जे सहजतेने लोकांना उपलब्ध होऊ शकेल त्याचा स्वीकार केला जावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.बांबूपासून उर्जा निर्मिती हा एक महत्वाचा प्रयोग अलिकडच्या काळात समोर येत आहे. त्यादृष्टीने  उत्तम आणि दर्जेदार बांबूची लागवड राज्यात होणे, वन आणि वनेतर जमिनीवर बांबू लागवड वाढणे आवश्यक आहे.  यासाठी आवश्यक असणारे शास्त्रोक्त प्रशिक्षण, बांबूचे भरघोस उत्पन्न देणाऱ्या प्रजाती, कमी दिवसात उत्पन्न देणाऱ्या प्रजाती, याबाबत बांबू विकास मंडळाने मार्गदर्शन करावे, आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे. उद्योगाकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करतांना मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधला जावा, त्यामाध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली जावी, यासाठी ही बांबू मंडळाने भरीव प्रयत्न करणे अगत्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्यावतीने आज बैठकीत ते करत असलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात आले.आतापर्यंत २०९ लोकांना मंडळाने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले असून यामध्ये फर्निचर तयार करणे, बांबू टर्निंग आणि बास्केट्री याचा समावेश असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. केंद्रात २ वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन बांबू टॅक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून यास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. महिला बचतगटांना बांबूपासून बास्केट बनवणे, कचराकुंडी बनवणे, चटई बनवणे, पंखे, पानदान, लॅम्प, शेड बनवणे याचे प्रशिक्षण या केंद्रातर्फे दिले जात आहे. त्यातून महिला बचतगटातील स्त्रियांची आर्थिक सक्षमता होत असल्याचे  यावेळी सांगण्यात आले.राज्यात बांबू उद्योगाला चालना मिळण्यासाठी आणि बांबू वस्तूला जागतिक बाजारपेठ उपलब्ध वहवी यासाठी ५ जानेवारी २०१७ रोजी टाटा ट्रस्ट आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.वनपर्यटनातून रोजगार संधीचा विकासयाच बैठकीत ताडोबा पर्यटन विकास आराखड्यावरही सविस्तर चर्चा झाली. ताडोबामध्ये महिनानिहाय गेल्यावर्षी किती पर्यटक आले, किती गाड्या आत सोडल्या, त्यापासून किती उत्पन्न मिळाले याची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी असे सांगून सुधीर  मुनगंटीवार यांनी गाईडसना प्रशिक्षण देणे, त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये एक समानता असणे यासारख्या गोष्टीही खुप महत्वाच्या आहेत,  त्याकडे लक्ष दिले जावे अशा सूचना यावेळी केल्या.  वनपर्यटनातून स्थानिकांना रोजगार आणि त्यातून सक्षमीकरण या विषयाच्या अनुषंगाने बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMumbaiमुंबई